Monday, 4 March 2019

आदिवासी बचाव आंदोलन


¦! दहाड अब मेरे आदिवासी !¦

ऊठ अब मेरे आदिवासी !
कसम तुझे बिरसा ,खाज्या ,तंट्या ,गुलामबाबा और अंबरसिंग महाराज की ,
द्वेष -मत्सर ,भेदभाव की सारी दिवारे तोडकर ,
स्थापना करने हेतु मुलनिवासी राज की |

बढ रहा है अब अत्याचार ,
खत्म अब उसे करना होगा ,
देश के इस सच्चे शेर को ,
मनुवाद को मिटाने हेतू अब दहाडना होगा |

कुंभकर्णिय नींद में सोते सोते ,
पानी सिर से ऊपर बह रहा है ,
अब तो तेरे अस्तित्वपरही सवाल मँढरा रहा है ,
ये सच तुझे क्यों नही समझ में आ रहा है ?

देखा है मैने एक मुर्गी को ,
शेरनी का अवतार लेते हुए ,
अपने लाडले पर पॉव रखने वाले इन्सान पर ,
पुरी जोरों से हमलावर होते हुए |

अचानक हुए इस हमले से ,
भागने लगा वो इन्सान इधर -उधर ,
अगर तु भी दहाडने लगेगा ,तो
कौन अत्याचारी रुकेगा तेरे अगल - बगल ?

जय आदिवासी ¦¦ आम्ही आदिवासी
 ता .शहादा जि .नंदुरबार

देवमोगरा माता यात्रोत्सव


*याहामोगी माता यात्रोत्सवाच्या शुभेच्छा*


 
          याहामोगी पुजन म्हणजे हजारो वषाॅपूवीॅ आदिवासी जमातीनी शोधलेला शेती महोत्सव आदिवासी समाजात कोणताही सण उत्सव वषाॅतुन एकदाचं केला जातो. निलीचारी, वागदेव ,गव्हाणपुजन ,गांव दिवाली ,कणी(धान्य )पुजन, होळी इत्यादी सण उत्सव निसर्गातील प्रतीक असुन काल्पनिक देव नसून निसर्गातील वस्तू प्रत्यक्षात जीवनात उपयोगी आल्या त्या त्या वस्तूना देव मानून पुजन करत असतात. पुवीॅच्या काळापासून आदिवासींच्या अलिखीत परंतु मौखिक परंपरा आहे आदिवासी समाजातील कहानीकार  (मोडवी )मौखिक कथा सांगतात.
         हजारो वषाॅपूवीॅ लोक जंगलात समुहाने फिरून भटके जीवन जगुन काढत होते. समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे,फळफुल इत्याद खाउन गुजराण करायचे.

         तेव्हा दाब मंडळातील प्रमुख   कोलपासाहा,   गोर्याकोठार,   देवगोंदारी,   विन्यादेव,   राजापांठा,   तारहामहल,   उमरावाणु,   हेलबदेव,   आगीपांडर.   यानी अथक परिश्रम करून जंगलातील सवॅ प्रकारचे धान्य एकत्र गोळा करून त्यामधुन लोकांच्या उपयोगी येईल असे धान्य वेगळे केले.
          
          त्यानंतर दाब येथे सामुहिक शेती करून बी -बियाणे म्हणून कोठार भरून ठेवले. त्यानंतर या भुमीवर भटके जीवन व कंदमुळे खाऊन जीवन जगणार्या लोकांना,
बी-बीयाणे कसे साठवून ठेवायचे,
अन्न कसे शिजवुन खायचे,
शेती कशी करायची,
याभुमीवर व्यवहारी जीवन कसे करायचे,
रीतिरिवाज व्यवहार शिकविले.
जे या लोकांना हे सवॅ ज्ञान माहिती नव्हते.
त्यांच्या या महान शोधाच्या कारणांमुळे लोक त्याना देव समान पुजायला लागले.
त्याना आपल्या कुळ सोबत जोडले.
जे आज आपण कुलदैवत म्हणून पुजन करतो.
       
           हजारो वषाॅपूवीॅ तापी व रेवा(नमॅदा)नदीच्या मध्ये दाब नावाचे राज्य होते. आजही तो परिसर हेलोदाब म्हणून ओळखले जाते. तेथे राजा *कोलपासा* याचे राज्य होते. दाब राज्याच्या भोवताली असलेल्या प्रमुखांना एकत्र आणुन त्यानी मोठे राज्य स्थापन केले होते. त्याभागातील प्रमुखांच्या ताब्यात असलेल्या भागाला पाटी म्हणून ओळखतात

कोल म्हणजे पृथ्वीचा मध्य.
दाब म्हणजे खंडण्याची जागा.

         दाब गावात पुवीॅच्या काळी राजापांठा व गांडाठाकोर(विन्यादेव) यानी  गाव दिवाळी साजरा केला त्यावेळी नाचुन -नाचुन पाडलेली खड्डयाची जागा म्हणजे दाब.

          दाब या केंद्रस्थानापासुन भोवताली चारही दिशांना आदिवासी बोली भाषेत खोंड(पाटी)म्हणतात. त्याना नांवे ही दिली आहे.  पुवेॅला -निमाडपाटी,  पश्चिमेला -आंबुडापाटी,  दक्षिण -देहवाव मावचार पाटी,  उत्तर दिशेला -नोयरपाटी  अशा प्रकारे नावे त्याकाळी ठेवण्यात आली होती. 

            या दाब मंडळात  टुडो मोडवी,  पेचरो पुजारा,  हेंगलो गुण्यो  असे जाणकार मंडळी होती.

       कोलपासाहा,  बाहगोर्या,  देवगोंदारी,  राजापांठा,  गांडाठाकोर(विन्यादेव),  आगीपांडर,  पोरबदेव,  सिडगोवा हे मंडळाचे प्रमुख होते.

          राजापांठा व गांडाठाकोर (विन्यादेव ) यांचा राजगुरु वैदु भिलट व आंबुडापाटीचा प्रमुख राजातारहामहल राजापांठाची आई उमरावाणु हे राज्य कारभारात सल्ला देत असे.

          दाबच्या राजा कोलपासाहा हे या चारही पाटी प्रमुख यांची वषाॅतून एकदा मोठी सभा कोलदाब येथे घेत असत. त्या सभेला मोलहोबाय असे नाव होते. यासभेत चारही पाटीचे प्रमुख आपल्या जनतेच्या हिताचे महत्त्वाचे ठराव करीत असे. या प्रमुख पंचाच्या निणॅयाने दाब मंडळात महत्त्वाच्या व्यक्तींना वेगवेगळे जबाबदारीचे काम सोपविले जात. त्यात बाहगोर्या याला दाब मंडळाच्या कोठार प्रमुख, राजासिडगोवा याला जकात वसुलीचा प्रमुख म्हणून नेमले होते.

           राजापांठा व गांडाठाकोर(विन्यादेव )हे सवॅ प्रमुख पंचातअतिशय सामर्थ्यवान व बुद्धीमान असल्याने त्यांच्यावर संपूर्ण दाब मंडळाचे देखरेखीचे व सुरक्षेचे काम देण्यात आले होते.

               कोलपासाहा नगरी हेलोदाब मध्ये  बाहगोर्या,  चिडगोवा,  दोध्यावजीर,  खेटापुजारा,  टुडा बोडवा,  बाबा हेगवा,  बाबा डुंगो,  बाबाठोढगा,  बाबाओढुवा,  बाबारोज्या,  बाबाहाटो,  बाबाखोगज्या,  जांम्बुगढ,  बाहाआंबाडा या दाब मंडळ शिवारातील देवदेतांचे पुजन करायचे त्यासाठी काकड झाडाचे पुजा करून निसर्गाचे प्रतिक बनविले होते.

           दाब मंडळाच्या कोठार बाहगोर्या यानी  गांडाठाकोर (विन्यादेव),  आगीपांडर(कणी), अनहोरीदेव (मका) यांचे पालन पोषण केले होते.  पुवीॅच्या काळी समुह शेती करण्याची प्रथा होती.

           त्याप्रमाणे बाहगोर्या यांनी नवीन शेती तयार केली. व त्या शेतात कणी (ज्वारी) ची पेरणी केली. शेत निंदणीसाठी लाहया (सामुहीक मदत) दाब मंडळातील प्रजेला मदतीसाठी बोलावले होते. लाहयाासाठी आलेल्या लोकांना जेवण व दारू दिले. शेतात ज्वारीला कणस येऊन पिकायला लागले. त्याची राखण करण्यासाठी शेताच्या बांधावर माळा बनविला होता. शेत राखण करण्यासाठी बाहगोर्या यानी गांडाठाकोर,आगीपांडर, अलहोरीदेव यांना शेतात पाठविले व माळावर चढून राखण करायचे होते.
           सवाॅत अगोदर गांडाठाकोर यानी चढुन पाहिले. पण त्याला वरती चढताजमलेनाहीत्यानंतर आगीपांडरला चढायला लावले. आगीपांडर वयाने लहान असल्याने पटकन चढुन वरती जा ऊन बसली. त्यानंतर ओलहरीदेव (मका) याला वरती चढायला लावले. परंतु ओलहरीदेव याला वरतीही चढता येत नव्हते व खाली ही उतरता येत नव्हते. त्याला मध्यंतरी बसावे लागले. आगीपांडर (कणी) शेंड्यावर जाऊन बसल्याने वरती लागते.  ओलहरीदेव (मका )मध्येच बसल्याने मध्यभागी लागतो. कणी (ज्वारी ) जेव्हा पिकुन झाल्यावर कापल्यानंतर खळ पुजन राजापांठा याने केले.

          राजापांठा हा अतिशय बलवान व वेगवेगळ्या शस्त्र विद्येत प्रविण होता.  त्याची आई उमरावाणु मंत्रतंत्र विद्येची जननी मानली जाते. तिने राजापांठाला देखील त्याचा संरक्षणासाठी मंत्रतंत्र विद्या शिकवली होती.  तरूणपणी राजापांठा हा त्याचा वडीलांच्या राज्यातील प्रजेला नेहमी मदत करीत असे. 
राजापांठाला नऊ राण्या होत्या त्या 
देवरूपण,  देव काटण,  देवमुरखु,   देवकुपल,   मांडववोरही,   हेलीवोडल,   आगीपांडर,   फुलमोगरा या  पुवीॅच्या आठ राण्या होत्या.

ईकडे हेलोदाब येथे रेलानकेला देवी व पांग्या वणजी यांच्या घरात याहा मोगीच्या जन्म झाला होता.
याहामोगीला  मोगीपेंडरी,  आगीपांडर,  कणी,  अनहोरीदेव,   निसबकसबदेव,  उरतीनपुरतीदेवी,  कुयटी  आथुटी  ही भाऊ बहीण होते.

          याहामोगी वयात आल्यावर राजापांठाने तिला मागणी घातली परंतु राजापांठाला पुवीॅच्या आठ राण्या होत्या.  तो केवळ आपल्या सौंदर्यावर मोहीत होवुन आपल्याशी लग्न करू इच्छितो असे वाटल्याने त्याला घर जवाई म्हणून दाबच्या राजाकडे राहण्याची अट घातली. आपल्या पुवीॅच्या आठ राण्या असुन देखील याहामोगीला प्राप्त करण्यासाठी दाबच्या राजाकडे सात वषेॅ घरजावई म्हणून राहिला. सात वषाॅच्या सेवा काल पुणॅ केल्या नंतर ते दोघे ही घाणीखुट येथे जीवन जगावयाचे ठरविले.

          परंतु त्याना राजा तारहामहल यांनी घरात घेतले नाही. राजापांठा व याहामोगी याना अनेक प्रकारच्या  हाल अपेष्टा सहन करीत जंगलात भटकत राहिले. त्यानंतर त्यानी देवमोगरा गाव वसविले व दोघे  तेथे एक झोपडी वजा घर बांधुन एकटेच राहु लागले. त्या कालावधीत बारा वषाॅच्या दुष्काळ पडला दाब मंडळातील लोकांची गुरेढोरे मरण पावली. बरेच लोक या दुष्काळात मरण पावले व काही लोक आपली घरेदारे सोडून निघून गेले. दाब मंडळातील राज्ये उजाड सारखे झाले.

          या कालावधीत याहामोगीने उपासमारीने हैराण झालेल्या लोकांना भरपुर अन्न धान्य व पशुधन दिले. लोकांना भाकरीसाठी अन्नधान्या व पशुधन पुरविले म्हणून तिला दाब मंडळातील प्रजा याहा मानु लागले.  आदिवासी मध्ये याहा म्हणजे आई व मोगी म्हणजे ज्याची किंमत होत नाही त्याला याहा मोगी सांगतात.

*याहामोगी पुजन* :-
शेतातील धान्य पिकल्यानंतर आपल्या स्वतःच्या शेतातील धान्य एक टोपली मध्ये भरून दर वषीॅ दाब मंडळातील   निमाडपाटी,  आंबुडापाटी,  देहवालपाटी,  मावचार पाटी,  नोयरपाटी,   नाहालपाटी

           या प्रदेशातील प्रजा देवमोगरा गावी आमावस्ये (खुट्टा) च्या दिवशी सामुहीक (होब) एकत्र होउन शेताच्या व अन्नधान्याच्या शोध लावलेल्या आपल्या देवी देवदेतांचे पुजन करतात, तसेच त्यानी तयार केलेल्या कोठार मध्ये धान्य बियाणे स्वरूपात जेव्हा भविष्यात दुष्काळ पडला तर हे साठवुन ठेवलेले बियाणे परत मिळेल या आशेने कोठार मध्ये जमा करत होते. ही परंपरा हजारो वषाॅपूवीॅची असुन ती परंपरा आजही चालत आहेजे आज आपण हिदारी स्वरूपात आणत असलेले टोपलीतील विविध प्रकारचेधान्य पुजन करतांना पाहतो. याहामोगीची पुजा नाही फुलहाराने, नाही नारळ, अगरबत्तीनी याहामोगीची पुजा होते हिदारी व महुफुलाच्या दारूने.

            आदिवासी समाजातील कोणत्याही देवीदेवता यांना फुलहाराने,अगरबत्ती, नारळ किंवा सेंदुर चढवला जात नाही. परंतु आजच्या शिक्षीत आदिवासी समाज आपल्याच वैभवशाली परंपरेला ठेच पोहचवुन प्रकृति विरूद्ध व्यवहार करत आहेत. ज्यामुळे स्वतःच्या परंपरेला नुकसान पोहचवत आहे. खरे हे आहे की,याहामोगीला पुजेसाठी जाण्या अगोदर मानता करून बांबूच्या काड्याची नवी टोपली त्यात विविध प्रकारचेधान्य मुहुफुलाची दारू एका पांढर्या कपड्यात बांधून हिदारी (टोपली )महिलेच्या डोक्यावर ठेवुन देवमोगरा येथे कणी पुजनसाठी जातो. कथा ही आहे की, याहामोगी धन धान्य, फळ फुल,वृक्ष, पान,कंदमुळे, कणी कनसरीचा विविध रूपात धरती पोटी जन्म घेतला आहे.

भगत,पुजारा, बडवे, मोडवी (आदिवासी इतिहास कार) यांच्या मौखिक कथा वरून एक वैभवशाली संस्कृतीच्या इतिहासाची माहिती होते.

            आजही आदिवासी समाजात पुवाॅपार संस्कृति चालत आलेली आहे. त्या संस्कृतिच्या व कणीच्या उगम दाब येथून झाला आहे.  तीच संस्कृति आदिवासी समाजात रूढ झाली ती आजही कायम आहे.

Wednesday, 1 August 2018

👁 *तुमचा आरक्षणावर डोळा* 👁

👁 *तुमचा आरक्षणावर डोळा* 👁


👁 ** 👁

        _ऐवढी शी झोपडी आमची_
          _तुमचा माळ्यावर माळा_

   _फक्त आरक्षण आहे आमच्या कडे_
       _त्याच्या वरही तुमचा डोळा_

         _हातावरती पोट आमचे_
            _पाठी वरती विळा_

      _आजुनही बाप राखतोय_ 
              _तुमचाच मळा_

  _फक्त आरक्षण आहे आमच्याकडे_
      _त्याच्या वरही तुमचा डोळा_

  _फुटका मनी नाही आईला माझ्या_ 
    _जसा लंकेच्या पार्वतीचा गळा_ 

   _गावभर फिरतात पाटिल तुम्ही_
        _घालुनी पच्यास तोळा_

  _लोकशाहीच्या युगात तुमचा शाहीथाट_ 
      _लग्नाला केला खर्च भरम साठ_ 

  _तुमच्या लेकीचा बघुण लग्न सोहळा_
         _दिपुन गेला माझा डोळा_

    _फक्त आरक्षणच आमच्याकडे_
    _पन तुमचा त्याच्यावरही डोळा_

      _साखर सम्राट शिक्षण सम्राट_
_गल्ली पासुन दिल्लीला तुमीच सम्राट_

      _तुमच्या चार पिढ्या पदवीधर_
   _आम्ही आताशी शिकतोय शाळा_ 

  _फक्त आरक्षण आहे आमच्याकडे_
   _पण तुमचा त्याच्यावरही डोळा_

      **जय आदिवासी**आम्ही आदिवासी**

Tuesday, 3 April 2018

जात प्रतिबंध कायदा.( अॅट्रासिटी अॅक्ट) SC, ST


अधिक माहिती साठी येथे Click करा


💥जात प्रतिबंध कायदा.( अॅट्रासिटी अॅक्ट)💥
SC, ST आत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.

जात प्रतिबंध कायदा हे फार मोठे हत्यार SC,ST यांना दिले आहे. या कायद्यांची प्रखर पणे आमलबजावनी व्हावी व दलितांवर आन्याय होउ नये यासाठी हा कायदा तयार केला. फक्त जाती वाचक बोलले म्हणजे अॅट्रासिटी लागते आसा गैरसमज आहे पण
21 मुद्द्यावर हे कलम लागू होते. हा कायद मेडियात पाठवन्याचा माझा उद्देश आसा आहे की लोकांना या कायद्यांची जानीवी जागृती व्हावी व गुन्हा करनार्याला कायदा कळावा आसे गुन्हे घडणार नाहीत.हाच उद्देश.

कलम 3(1)1:- योग्य व अयोग्य पदार्थ खान्या- पिन्याची सक्ती करणे.

कलम 3(1)2:- इजा,अपमान करणे व ञास देने.

कलम 3(1)3:- नग्न धिंड काडने, मानवी अप्रतिष्ठा करणे.

कलम 3(1)4:- जमीनीचा गैर प्रकारे उपभोग करने.

कलम 3(1)5:- मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण करने.

कलम 3(1)6:- बिगारीची कामे करन्यास सक्ती/भाग पाडणे.

कलम 3(1)7:- मतदान करण्यास भाग पाडणे, धाक दाखवणे.

कलम 3(1)8:- खोटी केस, खोटी फौजदारी करने.

कलम 3(1)9:- लोक सेवकास खोटी माहिती पुरवणे.

कलम 3(1)10:- सार्वजनिक ठिकाणी अपमान करने.

कलम 3(1)11:- महिलांचे विनयभंग करने.

कलम 3(1)12:- महिलेचे लैंगिक छळ करने.

कलम 3(1)13:- पिण्याचे पाणि दुषित करने किंवा घान करने.

कलम 3(1)14:- सार्वजनिक ठिकानी प्रवेश नाकारणे.

कलम 3(1)15:- घर, गांव सोडण्यास भाग पाडणे.

कलम 3(2)1,2:- खोटी साक्षा व पुरावा देने.

कलम 3(2)3:- नुकसान करन्यासाठी आग लावणे.

कलम 3(2)4:- प्रार्थना स्थळ अथवा निवार्यासआग लावणे.

कलम 3(2)5:- IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करने.

कलम 3(2)6:- पुरावा नाहिसा करने.

कलम 3(2)7:- लोकसेवकाने कोणताही अपराध करने.

एवढया प्रकारे जात प्रतिबंध कायदा लावता येतो.

🔧फिर्याद नोंदवितांना घ्यावयाची काळजी.🔧

●●फिर्याद दाखल करावयास आल्यानंतर ठ!णेदाराने विना विलंब तक्रार नोंदउन घ्यावी.

●FIR मध्ये फिर्यादीचे व आरोपीचे नाव, जात, पत्ता काळजी पुर्वक स्पष्ट लिहावा. घटना कोनत्या कारणावरून घडली होती ते स्पष्ट नमूद करावे. फिर्याद उशीरा दाखल केली आसल्यास उशीराचे कारण लिहावे.जातीवाचक शिवीगाळ अथवा दुसरा कोनताही प्रकार आसेल त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
आरोपीच्या जातीच्या पुराव्यासाठी त्याच्या TC दाखला, पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.
फिर्यादीची व आरोपीची वैद्यकीय तपासनी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.

गुन्हा नोंद झाल्या नंतर त्याच दिवसी जिल्हा पोलीस अधीक्षक , DOS,SDM, तहसिलदार व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना दुरध्वनी/फोन व्दारे संबंधित पोलीस स्टेशनने कळवावे.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी कडे खालील कागदपत्रे त्वरित पाटवावीत.
1) FIR .
2) घटणा स्थळ पंचनामा.
3) आत्याचार ग्रस्तांचा जातीचा दाखला.
4) अारोपीच्या जाती बाबत TC. तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपञ .
5) अत्याचार ग्रस्ताचा वैद्यकीय तपासनी अहवाल व आरोपपत्र मदतकरण्यासाठी वरील कागदपञ देने/ दाखल गरजेचे आहे.

हि माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळवली  आहे तरी सर्वानी या साठी एकत्रीत येणे गरजेचे आहे —

अधिक माहिती साठी येथे Click करा

Tuesday, 27 March 2018

आदिवासी Mp3 Songs Sites : Use & Share



INDIA'S ROCKING MOBILE SITE. 
आदिवासी Mp3 Songs

Visit Now.. - 
Free Aadivasi Mp3 Song, Aadivasi HD Videos, 
Aadivasi Rodali, Aadiwasi Pawara Songs, Aadivasi DJ Single, 
Aadivasi NonStop DJ Mp3
Ringtone, Free Download Site.  

 Click Here : http://songsbook.a0001.net/
Try it now..

Sunday, 18 March 2018

आदिवासी अधिकार 5 वी अनुसूची


5 वी अनुसूची अमलबजावणी आता आपल्यालाच करायची आहे

तुमचे अधिकार लवकर मिळवा.

नाहीतर तुमची आदिवासी म्हणून ओळख संपवली की तुम्ही संपला म्हणून समजा.

भारतीय संविधानात आदिवासींसाठी जी 5वि अनुसूची व 6वि अनुसूची दिलेली आहे. तिची अंमलबजावणी 70 वर्षांनंतरही होत नाही.याला कारण आदिवासी एकजूट करून मागणी करत नाहीत.हे असले तरी आदिवासींपर्यंत शिक्षण नीट पोहोचवलं नव्हतं.त्यामुळे आदिवासींना काही गोष्टी नीट कळल्या नव्हत्या हेच मूळ कारण आहे.पण आज बरेचसे आदिवासी शिकून सुशिक्षित झाले आहेत.स्वतःचे विचार मांडत आहेत.आदिवासींचे हक्क व अधिकार माहीत झाले आहेत.पण एकजुटीचा अभाव व संघटन नसणे या गोष्टी आड येत आहेत.त्यामुळे 5व्या अनुसुचिची मागणी जोर धरत नाही. झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेशचे आदिवासी जागरूक झाले आहेत.5व्या अनुसुचिची मागणी करत आहेत.तेंव्हा आपणही मागे राहता कामा नये.

*काय आहे 5व्या अनुसूचित?*

अनुसूचित जनजाती अधिनियम 1874- हा इंग्रजानी आदिवासींसाठी कायदा केला होता.1919 व 1935 हे इंग्रजानी केलेले कायदे आदिवासींनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व या देशातल्या जल,जमीन, जंगलसाठी केलेल्या लढ्यामुळे केलेले कायदे आहेत. आदिवासींचा उठाव एवढा जबरदस्त होता की पूर्ण भारतातले आदिवासी एकत्र येऊन लढले असते तर इंग्रजांना लवकरच आपला गाशा गुंडाळावा लागला असता.म्हणून इंग्रजांनी आदिवासी एरिया सोडून राज्य करण्याचे ठरविले.आदिवासींच्या गणतंत्रिय व्यवस्थेला हात न लावण्याचे ठरविले.

आदिवासींची हीच स्वतंत्र बाण्याची परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही भारतीय संविधानात 244 (1) मध्ये 5वि अनुसूची तयार केली.

याअनुषंगाने काही नियम---

*अनुसूची 244 (1),(2)-*
नुसार आदिवासी हा स्वशासित आहे.त्याच्यावर बाहेरचे कोणीही नियंत्रण करू शकणार नाही.तो आपले शासन चालवण्यासाठी स्वतः उमेदवार निवडेल. भारतीय निवडणूक आयोगालाही तेथे हस्तक्षेप करता येणार नाही.कोणतेही राजकीय पक्ष तेथे हस्तक्षेप करू शकत नाहीत.आदिवासी आपले लोकप्रतिनिधी स्वतः निवडतील.

अनु.244(1) भाग (ख) परिच्छेद (4)  केंद्रशासन व राज्यशासन यांनी तयार केलेले कायदे आदिवासींच्या भागासाठी लागू नाहीत.आदिवासिंच्या सल्लागार परिषदेने मान्य केले तरच ते राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने आदिवासींच्या भागासाठी लागू होतील. त्यामुळे असे अनेक कायदे आहेत. उदा.IPC ऍक्ट, CRPC ऍक्ट, भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951, भूमीअधिनियम1993,नगरपंचायत अधिनियम, महानगरपालिका अधिनियन,मोटरवाहन व परिवहन आदी कायदे आदिवासी एरियात लागू करताना आदिवासींची संमती घेतली पाहिजे.

तसेच अनुसूची 141 अन्वये सर्वोच्च  न्यायालयाचा एक आदेश आहे.( ए.पी.सेन.बनाम 1971)
  यात म्हटलेले आहे.आदिवासी हिंदू नाहीत.ते स्वतंत्र आहेत.त्यामुळे हिंदू कायदे त्यांच्यावर त्यांच्या संमतीशिवाय लादू नयेत.
तसेच आदिवासी ज्या भूभागावर निवास करतील तेथेही त्यांच्यावर कोणतेही कायदे लागू नाहीत।ते फक्त आदिवासी कायदे,रूढी व प्रथा नुसार संचलित होतील.

तसेच अजून एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. (वेदांता जजमेन्ट)

भारतीय लोकसभा व राज्याची विधानसभा यापेक्षा
 ग्रामसभा ही श्रेष्ठ आहे.

नन्दाभाई भिलप्रकरण महाराष्ट्रातीलनुसार एक सर्वोच्च न्यायालयाचा फैसला.( ५जानेवारी २०११)
आदिवासी भारत का असली नागरिक है।
आदिवासी राष्ट्र है।

बाबांनो, हे एवढे अधिकार या देशातल्या मूळ मालकाला दिले आहेत.ते फुकट मिळालेले नाहीत. तेयेथील  मूळरहिवासी या न्यायाने तर आहेतच पण आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षामुळे ही आहेत.

कोणी जर न्यायालयाचे आदेश पाळत नसेल.या देशातल्या संविधानाचे उल्लंघन करत असेल तर भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार अशा नागरिकांचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते.

Wednesday, 14 February 2018

सातपूडा होली महोत्सव ( धंडगाव & अक्कलकुवा ) जि. नंदुरबार , Satpuda Aadivasi Holi Festival Dhagaon & Akkalkuwa

 सातपूडा आदिवासी होली महोत्सव वेळापत्रक - 2021 :


दाब,मनवाणी         :24-03-2021
गोरंबा,काकरपाटी,खांडबारा:25-03-2021
खुंटामोळी,गौऱ्या, रमसुला  :26-03-2021
कालीबेल,कुंडल        :27-03-2021
 सुरवाणी,काठी,मांडवी    :28-03-2021 
मोलगी, काकडदा       :29-03-2021
जामली,असली,राजबडीँ   :30-03-2021
जमाना,धनाजे          :31-03-2021
बुगवाडा              :01-03-2021

सातपूडा होली महोत्सव Video Click Here (येथे पहा.) 

सातपूडा आदिवासी होली महोत्सव ( धंडगाव & अक्कलकुवा ) :

                  जि. नंदुरबार ता. धंडगाव & अक्कलकुवा येथील होळीस हजारो आदिवासींची उपस्थिती जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगा पांरपरिक आदिवासी होळी सणात न्हावून निघाल्या असून सर्वत्र होलिकात्सवाचा जल्लोष दिसून येत आहे.
                  जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगा पांरपरिक आदिवासी होळी सणात न्हावून निघाल्या असून सर्वत्र होलिकात्सवाचा जल्लोष दिसून येत आहे. ७५० वर्षांपेक्षा अधिकची पंरपरा असलेल्या सातपुडय़ातील काठी संस्थानची मानाची ‘राजवाडी होळी’ गुरुवारी पहाटे पेटविण्यात येत आहे
                  आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचीत झाला आहे. या होलिकात्सोवाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दाखल होत असतात. चार दिवसांपासून सातपुडय़ातील दऱ्या-खोऱ्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात होळीचा ज्वर वाढला असून विविध ठिकाणच्या भोंगऱ्या बाजारांनी या होलिकात्सवाला सुरवात झाली आहे. या बाजारातून आदिवासी होळीची खरेदी करतात. काठी संस्थानाच्कया राजवाडी होळीला आदिवासींमध्ये विशेष महत्व आहे. होळीत वापरली जाणारी उंच काठी गुजरातच्या जंगलातून आणण्यात येत असते. या ठिकाणी राजा उमेदसिंग यांची गादी आणि त्यांच्या शस्त्रांच्या पूजनानंतर ढोल आणि बिरीच्या तालावर आदिवासी नृत्यांनी सातपुडा गजबजून गेला.  सकाळी सहाच्या सुमारास ही मानाची काठीची राजवाडी होळी पेटविण्यात येते. काठी प्रमाणेच असली, रोझवा पुनर्वसन, जावदा वसाहत आणि वडछील वसाहतीतही राजवाडी आदिवासी होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. वडछील वसाहतीमध्ये तर विविध प्रकारच्या आदिवासी पांरपरिक नृत्य, ढोल वाजन अशा स्पर्धा घेण्यात येतात.
होळीसाठी नवस ठेवून खास बुध्या, बावा, घेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी आदि प्रकारच्या पांरपरिक होळीच्या प्रतिकांचा पेहराव आदिवासींनी केला आहे. यासाठी होळीच्या पाच दिवस आधीपासूनच ब्रम्हचर्यत्व धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते. विविध रुप धारण केलेले आदिवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकात्सव साजरा करतात. पुढील पाच दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा अशा ठिकाणी होळी उत्सव होणार आहे.







सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोगंर्‍या बाजाराचे वेध लागत असतात. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगर्‍या बाजाराची परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणार्‍या भोंगर्‍या बाजारात आदिवासी बांधवांचे जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येते असते. सातपुड्याच्या पर्वतरांगेत पावरा, पाडवी, गावीत, भिल्ल अशा प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. या जमातीत दिवाळी आणि होळी या सणांना असाधारण असे महत्त्व आहे.

सातपुड्यात असलेल्या आदिवासी पाड्यात विविध ठिकाणी पाच दिवसाचा होळी सण साजरा केला जातो. पाच- सहा पाडे मिळून एकच होळी पेटविली जाते. पारंपारिक पध्दतीने आदिवासीबांधव सपत्नीक होळीचे पुजन करतात. होळी प्रज्वलीत झाल्यानंतर आदिवासी महिला- पुरूष मोहाच्या फूलांची दारू (कच्ची दारू) सेवन करून ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठीही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात. सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो, त्याला मधेच खंड पाडून चालत नाही. नवस मधेच बंद पाडला तर देवाचा कोप होतो, अशी‍ ही समजूत आदिवासी बांधवांमध्ये आहे.

होळी सणासाठी फाग (देणगी) मागण्याची पध्दत आहे. आदिवासी महिला- पुरुष आदिवासी पाड्यामध्ये घरोघरी जाऊन फाग मागत असतात. देणगी गोळा करून पाच ते सहा पाडे मिळून होळीचा सण साजरा केला जातो.













*भोंगऱ्या*
          भोंगर्‍या' हा होळी सणाच्या अगोदर येणारा व आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला 'बाजार' (जत्रा) होय. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. प्रत्येक आद‍िवासी पाड्यांचे मुखीया नदी काठी एकत्र येऊन बाजार भरविण्याबाबत निर्णय घेत असतात. होळी सणाअगोदर एक दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरविला जातो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव ढोल, पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला येतात. आदिवासी तरूण- तरूणी मोठ्या संख्येने या बाजारात उपस्थित होत असतात. प्रत्येक गावातून आठ ते दहा गृप नाचण्यासाठी येत असतात.
                भोंगर्‍या बाजारात होळीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी केले जाते. नारळ, खोबरे, दाळ्या, गूळ, साखरेचे हार, कपडे, रंगीत कागद, रंग आदी वस्तूंची खरेदी करून आदिवासी बांधव आपाआपल्या गावात परततात. होळीच्या दिवशी जंगलात जाऊन बांबूची अथवा विशिष्ट प्रकारची लाकडे तोडून होळीच्या ठिकाणी जाळतात. त्या अगोदर त्यांची पूजा केली जाते. ढोलीला नवीन चामडे चढवतात.

(होळीपूर्वीचा हाट बाजार ) :

          *दांडा* महिना चालू झाला की होळी भरण्याच्या ठिकाणी होळीचा दांडा उभारला जातो, दांडा महिण्याअगोदरच शेतीची कामे उरकवली जातात जेणे करून वर्षातून एक महिना पुरेसा आराम घेता यावा.
          *पण दांडा महिन्यात लग्न केली जात नाही* ह्याच महिन्यात होळीच्या आदल्या दिवशी भरतो तो म्हणजे *भांगोर्या बाजार*  होळीच्या खरेदीचा केंद्रबिंदू, होळीचा हाट बाजार..... बाजाराचा पहिला दिवस हा  *गुलाल्या बाजार*  म्हणून प्रचलित आहे, गुलाल उधळून भोंगऱ्या बाजाराची सुरवात केली जाते,होळी चालू झाली याचे संकेत देण्याकरता गुलाल उधळला जातो आणि म्हणूनच होळीपूर्वीचा शंखनाद अस ह्या दिवसाला म्हणता।
           फाल्गुनोत्सवानिमित्त भरणारा भोंगर्‍या बाजार हा पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. परंतु या बाजाराबद्दल अनेक गैरसमज बाहेरच्या जगात आहेत . मुली पळविल्या जातात, लग्न करण्यासाठी जोडपे पळतात, गुलाल लावला जातो आणि आपला जीवनसाथी निवडला जातो वगैरे ।
परंतु असा कुठलाही प्रकार या बाजारात होत नाही हे ठामपणे पटवून द्यायला हवे. पारंपारिक कारण असे की दांड्याच्या महिन्यात कोणतेही व्यवहार केले जात नाही, मंगल कार्य केले जात नाही, लग्न जोडले जात नाहीत, मग मुली पळवून लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही.  (गावातील जेष्ठ मंडळी नुसार एक म्हण अशीही प्रचलित आहे की जो या काळात लग्न करतो त्याला मूलबाळ होत नाही, हा झाला प्रचलित अंधश्रद्धेचा भाग) समाजातील कोणत्याही आपल्या वरिष्ठ मंडळींना विचारल्यास याची प्रचिती येते, पोरीला साधा गुलाल लावायच सोडा, छेड जरी काढलीत तरी महायुद्ध होईल अशी परिस्थिती असते, कारण या बाजारात प्रत्येकजण शस्त्राशस्त्र घेऊन असतो, त्यामुळे पोरीला पळवून नेण्याची हिम्मतही कुणी करू पाहणार नाही.
           ज्याठिकाणी भोंगर्‍या बाजार भरतो त्याठिकाणी आजू-बाजूच्या परिसरातील आदिवासी पावरा बांधव एकत्र येतात. 
वर्षभराचे अन्नधान्य, नवीन कपडे परिधान व खरेदी केले जातात, होळीपूजनासाठी लागणारे साहित्य विकत घेतली जातात, होळी सुरू झाली या जल्लोशात पारंपरिक ढोल, बासरी आदी वाजवून मनसोक्त नाचले जाते. होळी हा आदिवासी समाजाचा पवित्र सण आहे आणि दांडा हा पवित्र महिना, त्यामुळे याचे जितके अप्रचार आहेत ते अगदी खोटे आहेत, होळी हा सण म्हणजे उल्हासाचा आणि जनसम्पर्क साधून लोकांना एकत्र आणण्याचा पूर्वजांचा प्रयत्न आहे, सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी केलेला पूर्वजांचा एक आनंद सोहळा आहे.
           या अश्या महान सोहळ्याचा आणि पर्वाचा अपप्रचार होणे हे दुर्दैवी, ज्या जल्लोषात आपण हा सण साजरा करतो, त्याच प्रमाणे प्रखरपणे या बद्दलची खरी माहिती लोकांपुढे आणावी आणि प्रचार करावा ही सर्व समाजबंधूंना विंनती।

                                          Story 2 :


  
"ओली आवे बारा मोयना ओली या,
ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"

               अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जाऊ लागली आहेत. होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते, सर्वाना एकञित करुन समुहजीवनाचे धडे देते. यावेळी "होळी म्हणजेस आदिवासी आणि आदिवासी म्हणजेस होळी" हे समीकरण बनते, आणि आदिम अस्तीत्व-प्रतीकांची जीवंत अनुभूती घेता येते...!
        (दांड) माघ अमावस्येला निघलेल्या नव्या को-या चंद्रदेवतेला (नोवू) नमन करुन होळी उत्सवाची सुरवात होते. येथूनच पथ्याची (पालनी) सुरवात होते. नेराय, गोवाण* आणि इतर गोष्टीसाठी पालनी होत असताना जो कोणी मोरखी, बावा तथा ढाणका डोकोअ होईल तो मांसाहार वर्ज्य करतो. स्ञियांना स्पर्श न करणे, खाट-खुर्चीवर न बसणे, स्वतंञ ( अलिप्त ) राहून कमी साधने वापरणे, चपला न घालणे अशी अनेक पथ्ये पाळली जातात. पालनीचा कालावधी पाच-सात-नऊ दिवसाप्रमाणे कमी अधिक असतो. यात पथ्ये पाळताना कचुराई केलो तर होळीचा कोप होतो म्हणतात. आणि या दिवसापासूनच मोरखी, बावे होण्यासाठी जी सामानाची जुळवा-जुळव करावी लागते. त्याची शोधाशोध, साफ-सफाई व जमवा- जमव सुरू होते. गावात होळीचा माहोल तयार होतो.
                 साधारण सप्टेंबर महिन्यापासुन सातपुड्यातील आदिवासींची रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर होण्यास सुरवात होते. पावसाच्या बेभरोसे शेतीवर आदिवासींच भागत नाही आणि स्थानिक पातळीवर रोजगार नाही म्हणून आदिवासींची गाव-कुंटूबे ओस पडतात. म्हातारी-वृद्ध मंडळी व लहान पोरं-बाळं तेवढी घर, गाई-गुरांच्या देखभालीसाठी असतात. सातपुड्यातली गावं फेब्रुवारीपर्यत तरी अशीच भकास, उदास व सुनी-सुनी वाटतात. जशी वसंताची चैञपालवी नव्या सुरवातीची चाहूल घेऊन येते तशी होळी आदिवासीत नवचैतन्य घेऊन येते. उत्साह उधळायला, मनसोक्त नाचाया- गायला लावते. खरतर होळी आदिवासींच्या दु:खावर पांघरुण घालते. दुःख विसरुन आनंदाचा शोध घ्यायला लावते. नवनिर्मितीची प्रेरणा देते. दुःख-गरिबीतही आनंदाने नाचता येते. होळी अशीच सहजपणे सर्वाना सामावून घेते. नवीन उत्साह व उभारी देते. यावेळी सातपुड्यातल्या आश्रमशाळा, शाळा ओस पडतात. वसतीगृहात राहून शिकणारी आदिवासी पोरं गावाकडे परतण्यास आतुर होतात. न चुकता सर्वाची पावले होळीवर थिरकण्यासाठी गावाकडे परतात. गावं कशी पुन्हा एकदा ढोलच्या तालावर एकञ येत नाचू लागतात. एकमेकांशी एकरुप होऊन होळीची तयारी केली जाते. होळी नाचली- गायली जाते.
              नोवू दिसल्यानंतर आदिवासी गाव-पाड्यावर ढोल- ढोलगीच्या तालात युवक-युवतीचा नाच रंगतो. ही गावातील पोरं-पोरी, लहान मुलं याची होळी असते जी गावातील काही मुलं जंगलात जाऊन बांबू उखळून आणतात. आंब्या-जांभूळाची पाने असलेल्या फांदी बांबूला बांधून पेहराव, सजावट केली जाते. बरोबर बाअडी, सानक्ये, साणी* बांधून सोबत 'ओली डोहू' आणला जातो. गावाच्या मध्यभागी 'ओली दोअ' त्यात लाकडाच्या साहाय्याने होळी उभी करुन ठेवतात. मग 'ढोल'वर थाप पडते, फेर धरला जातो, तालाला-ताल मिळतो आणि सहज सुंदर नृत्य रंगते. मुलीं होळीची बोलीगीते गातात आणि युवक आनंद व्यक्त करताना आदिवासी सुरात लय पकडतात. हा 'गोटूल'चाच एक प्रकार. युवक-युवतीवर वेळेचे निर्बंध नसते. आणि गावातील सर्व मंडळी अर्ध्या राञीपर्यत होळी मध्यभागी करुन नाच-नाचतात. यावेळी गायली जाणारी होळी विषयक गीते निसर्गाची आदिवासींच असलेलं नातं स्पष्ट करतात. हे पुरातन काळापासुन आजपर्यत न चुकता चालत आलेलं आहे. चालत राहिल.
होळी निमित्त सर्व गावकरी एकञ येतात. सामानाची जुळवा-जुळव करताना आपसूकच अडी-अडचणीवर चर्चा होते. मुख्य होळीच्या वेळी होणा-या कार्यक्रमाची ही रंगीत तालीम असते. ढोल चढवणे, चामडी बदलणे, नाडू गोवणे अशी कामं करुन ढोल तयार होतो. ढोलगी, खाट, मांदल, धा-या-तलवारी, हुप, मोरखी पिसे, टोपा, काहटे, डोवे, उंबराची माळ, दान-दागिने, इत्यादीची तयारी होते. काही वस्तू जंगलेत, काही गावात तर काही बाजारातून आणल्या जातात. होळी येईपर्यत मोहाची दारु गाळून तयार केली जाते. आजू-बाजूच्या गावपाड्यात होळीसाठी खोबर (निमंञण) धाडली जाते. मग गावकरी विशिष्ट दिवस ठरवतात व त्याप्रमाणे एक-एक करुन संबंध परिसरात ऐकमेकांत मिळून-मिसळून होळीचा आनंद घेतला जातो. प्रत्येकाची कामे स्वतंञ असली तरी सहकार्याशिवाय होळी होत नसते. यामुळे गावक-याची मने जुळतात. गावात एकोपा नांदतो.
             होळीच्या आवश्यक पुर्वतयारीनंतर खरा रंग येतो तो देवहोळी पेटविल्यानंतर. दाब (ता. अक्कलकुवा) येथे होणारी देवहोळी संपूर्ण सातपुड्यातल्या उत्सवाची नांदी असते. या होळीसाठी सातपुड्यातल्या सर्व भागातून डाया लोक उपस्थित राहून संबंध पहाडास होळी उत्सव शांततेत पार पाडण्याचा संदेश देतात. ह
सातपुड्याच्या ह्या होळीचा ढोल-ताशांचा गजर पूर्ण पहाडात दूमदूमत राहतो. मग एक-एक करुन मोलगी-धडगाव परिसरातील गावहोळीचा 'सीजन' सुरु होतो. काही ठिकाणी गावहोळीपूर्वी भोग-या बाजार ( होळीच्या तयारीसाठी आवश्यक सामान खरेदी) भरतो. हाच काही ठिकाणी 'मेलादा' म्हणूनही ओळखला जातो.
गावहोळीच्या दिवशी सायंकाळी मोरखी, बावा यांची पारंपारिक वेशभूषा त्यांच्या ठरलेल्या बडव्याकडून सर्व सामान ( काहटे, मोरपिसे, दान-दागिने, ढोलगी, टोपा, माळा, तलवारी-धा-या इ.) पूजा करुन परिधान केले जाते. मोरखी, बावा शरीर राखानेही ढिबून घेतात. हातात धा-या तलवारी, डोक्यावर मोरपिसे-टोपा चढवून गळ्यात ढोलगी, कमरेला काहटे-डोवे असा वेशधारी आदिमांचा ताफा वाजत-गाजत, नाचत-गात बाहेर पडतो. राञभर जो तो आपापल्या धुंदीत होळीमातेची आराधना करतो. राञीची झिंग चढल्यावर सकाळ कशी होते तेही कळत नाही.
सातपुड्यातली प्रत्येक गावहोळी विषेश असतेच. पण परिसरातील सर्व लोकांच्या मनात घर केलेली होळी म्हणजे काठी येथील राजवाडी होळी व मोलगीची प्रसिद्ध होळी.! येथे साजरी होणा-या होळीच वर्णन करणंच अशक्य. किमान 200-300 ढोल, मोरखी-बावा यांची 15-20 हजाराची तुफान गर्दी आणि साथीत बेधूंद होऊन नाचणारी लाखभर लोकं! यात नियोजित असा कोणताच भाग नसतो. आपापल्या परिने सर्व होळीला येत असतात. मिरवायला धा-या-तलवारी असतात, असतात गावक-याचे तांडे (मेलू). स्ञियांची संख्याही तेवढीच जास्त, मग राञभर होणारी होळीगीते व आदिम नृत्य. राञीच्या अंधार-उजेळात येथे ना कधी स्ञियांची छेडखानी होते ना कोणतीही हाणामारी. सर्व कसे एकमेकंत मिळून- मिसळून जातात. समतापर्व गाणारी ही होळी राञभर स्ञि-पुरुष एकञ येऊन साजरी करतात. येथे ना दुजाभाव असतो, ना लहान-मोठेपणाचा दर्प. सर्वाना आनंद घेण्याची स्वतंञ मूभा! होळीत गायली जाणारी बोलीगीते आदिम मौखिक साहित्याचा ठेवा आहे. पण त्याचबरोबर 'मामाच्या पोरी' व इतर गोष्टीवर पुरुष मंडळीनी योजलेली गीते अफलातूनच! होळी ही म्हणून बघण्याची गोष्ट नाही. होळी फेर धरुन सहभागास प्रवृत्त करते, राञभरचा उत्साह देते.
           होळीची राञ कशी सरते हे होळीत सहभागी झालो की कळतच नाही. दांडला दंडवत करता-करता राञी तीनच्या सुमारास होळीला पेरविण्यास सुरवात होते. राञभर होळीत येणारा प्रत्येक मोरखी, बावा न चुकता 'ओली दोअ' मधील माती बाजूला सारतो. आणलेली लाकडे लावून होळी उभी करतो. प्रांतः सकाळी पाचच्या सुमारास होळी पेटवतात तो खरा उत्कटतेचा क्षण असतो. होळी पेटवल्यानंतर पूर्वेकडे खाली पडली तर वर्ष सुख-समाधानाने जाते म्हणतात पण दुस-या दिशेला पडली तर वर्षभरात विघ्नं येतात म्हणतात. पेटवलेल्या होळीच्या जळत्या आगीतून मोरखी-बावा राख उचलतात. ती माथ्यावर अभिमानाने वंदन करतात. मग होळीवरुन परतण्यास सुरवात होते. सकाळी पायवाटेला धपाधप पावले टाकीत परतणारी लोकं पाहताना, त्यांच्या चेह-यावरील समाधानाचं तेज न्याहाळताना मन 'आदिवासी'च होऊन जाते.
               होळी झाली की सुरवात होते ती मेलादा (भोंग-या ) पर्वाची. मेलादा हे आदिवासी युवक-युवतीच्या आकर्षणाचे असते. मेलादात 'फाग मागण्याची व मेलादा पूजण्याची प्रथा खूप जुनी आहे. यात पारंपारिक वेशभूषा, वाद्ये तथा आदिवासीच्या ताकतीचे सुरेख प्रदर्शन केले जाते. नृत्याशिवाय तर मेलादा होऊच शकत नाही. मेलादा नृत्यात सहभागी होण्याची मजा काही औरच असते. मोलगी व जामली ( ता. अ.कुवा ) येथील प्रचंड गर्दीचे मेलादा बाजार डोळ्याची पारणे फेडतात. सर्वात शेवटचे मेलादा बाजार धनाजे व बुगवाडे ( ता. धडगाव ) येथे संपन्न होतात. यानंतर गावातील मोरखी मंडळीची गावाच्या प्रत्येक घरो-घरी फेरी निघते. कुंटूब-प्रमुख अत्यंत तन्मयतेने त्यांची सेवा करतो. अंगणात होळीचे नृत्य म्हणजे होळीमातेचे चरण घराला स्पर्श झाले असे समजले जाते. मग सर्व गावकरी मिळून गावाच्या नदी-नाल्यावर जाऊन पालनी सोडतात. 
                 होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी होते. या वर्षीची होळीही अशीच खास असते. मी तर महिना भरापासून होळीची वाट पाहतच आहे. मिञमंडळी बरोबर आम्ही जाऊन नाचणार. गाणार. मज्जाच मजा. तसं होळीला जाताना कोणतीही खुण-गाठ बांधून जायचे नसते. पण तेथे जाऊन कोणीही खाली हात परतत नाही हा इतिहास आहे. होळी माणसाला माणुस बनवते, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन. आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असं सर्वच देते, मायेच्या आशिर्वादासह.! आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. तोच होळीचा ठेवा असतो.




आदिवासी बचाव आंदोलन

¦! दहाड अब मेरे आदिवासी !¦ ऊठ अब मेरे आदिवासी ! कसम तुझे बिरसा ,खाज्या ,तंट्या ,गुलामबाबा और अंबरसिंग महाराज की , द्वेष -मत्सर ,भेदभ...