Monday, 4 March 2019

देवमोगरा माता यात्रोत्सव


*याहामोगी माता यात्रोत्सवाच्या शुभेच्छा*


 
          याहामोगी पुजन म्हणजे हजारो वषाॅपूवीॅ आदिवासी जमातीनी शोधलेला शेती महोत्सव आदिवासी समाजात कोणताही सण उत्सव वषाॅतुन एकदाचं केला जातो. निलीचारी, वागदेव ,गव्हाणपुजन ,गांव दिवाली ,कणी(धान्य )पुजन, होळी इत्यादी सण उत्सव निसर्गातील प्रतीक असुन काल्पनिक देव नसून निसर्गातील वस्तू प्रत्यक्षात जीवनात उपयोगी आल्या त्या त्या वस्तूना देव मानून पुजन करत असतात. पुवीॅच्या काळापासून आदिवासींच्या अलिखीत परंतु मौखिक परंपरा आहे आदिवासी समाजातील कहानीकार  (मोडवी )मौखिक कथा सांगतात.
         हजारो वषाॅपूवीॅ लोक जंगलात समुहाने फिरून भटके जीवन जगुन काढत होते. समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे,फळफुल इत्याद खाउन गुजराण करायचे.

         तेव्हा दाब मंडळातील प्रमुख   कोलपासाहा,   गोर्याकोठार,   देवगोंदारी,   विन्यादेव,   राजापांठा,   तारहामहल,   उमरावाणु,   हेलबदेव,   आगीपांडर.   यानी अथक परिश्रम करून जंगलातील सवॅ प्रकारचे धान्य एकत्र गोळा करून त्यामधुन लोकांच्या उपयोगी येईल असे धान्य वेगळे केले.
          
          त्यानंतर दाब येथे सामुहिक शेती करून बी -बियाणे म्हणून कोठार भरून ठेवले. त्यानंतर या भुमीवर भटके जीवन व कंदमुळे खाऊन जीवन जगणार्या लोकांना,
बी-बीयाणे कसे साठवून ठेवायचे,
अन्न कसे शिजवुन खायचे,
शेती कशी करायची,
याभुमीवर व्यवहारी जीवन कसे करायचे,
रीतिरिवाज व्यवहार शिकविले.
जे या लोकांना हे सवॅ ज्ञान माहिती नव्हते.
त्यांच्या या महान शोधाच्या कारणांमुळे लोक त्याना देव समान पुजायला लागले.
त्याना आपल्या कुळ सोबत जोडले.
जे आज आपण कुलदैवत म्हणून पुजन करतो.
       
           हजारो वषाॅपूवीॅ तापी व रेवा(नमॅदा)नदीच्या मध्ये दाब नावाचे राज्य होते. आजही तो परिसर हेलोदाब म्हणून ओळखले जाते. तेथे राजा *कोलपासा* याचे राज्य होते. दाब राज्याच्या भोवताली असलेल्या प्रमुखांना एकत्र आणुन त्यानी मोठे राज्य स्थापन केले होते. त्याभागातील प्रमुखांच्या ताब्यात असलेल्या भागाला पाटी म्हणून ओळखतात

कोल म्हणजे पृथ्वीचा मध्य.
दाब म्हणजे खंडण्याची जागा.

         दाब गावात पुवीॅच्या काळी राजापांठा व गांडाठाकोर(विन्यादेव) यानी  गाव दिवाळी साजरा केला त्यावेळी नाचुन -नाचुन पाडलेली खड्डयाची जागा म्हणजे दाब.

          दाब या केंद्रस्थानापासुन भोवताली चारही दिशांना आदिवासी बोली भाषेत खोंड(पाटी)म्हणतात. त्याना नांवे ही दिली आहे.  पुवेॅला -निमाडपाटी,  पश्चिमेला -आंबुडापाटी,  दक्षिण -देहवाव मावचार पाटी,  उत्तर दिशेला -नोयरपाटी  अशा प्रकारे नावे त्याकाळी ठेवण्यात आली होती. 

            या दाब मंडळात  टुडो मोडवी,  पेचरो पुजारा,  हेंगलो गुण्यो  असे जाणकार मंडळी होती.

       कोलपासाहा,  बाहगोर्या,  देवगोंदारी,  राजापांठा,  गांडाठाकोर(विन्यादेव),  आगीपांडर,  पोरबदेव,  सिडगोवा हे मंडळाचे प्रमुख होते.

          राजापांठा व गांडाठाकोर (विन्यादेव ) यांचा राजगुरु वैदु भिलट व आंबुडापाटीचा प्रमुख राजातारहामहल राजापांठाची आई उमरावाणु हे राज्य कारभारात सल्ला देत असे.

          दाबच्या राजा कोलपासाहा हे या चारही पाटी प्रमुख यांची वषाॅतून एकदा मोठी सभा कोलदाब येथे घेत असत. त्या सभेला मोलहोबाय असे नाव होते. यासभेत चारही पाटीचे प्रमुख आपल्या जनतेच्या हिताचे महत्त्वाचे ठराव करीत असे. या प्रमुख पंचाच्या निणॅयाने दाब मंडळात महत्त्वाच्या व्यक्तींना वेगवेगळे जबाबदारीचे काम सोपविले जात. त्यात बाहगोर्या याला दाब मंडळाच्या कोठार प्रमुख, राजासिडगोवा याला जकात वसुलीचा प्रमुख म्हणून नेमले होते.

           राजापांठा व गांडाठाकोर(विन्यादेव )हे सवॅ प्रमुख पंचातअतिशय सामर्थ्यवान व बुद्धीमान असल्याने त्यांच्यावर संपूर्ण दाब मंडळाचे देखरेखीचे व सुरक्षेचे काम देण्यात आले होते.

               कोलपासाहा नगरी हेलोदाब मध्ये  बाहगोर्या,  चिडगोवा,  दोध्यावजीर,  खेटापुजारा,  टुडा बोडवा,  बाबा हेगवा,  बाबा डुंगो,  बाबाठोढगा,  बाबाओढुवा,  बाबारोज्या,  बाबाहाटो,  बाबाखोगज्या,  जांम्बुगढ,  बाहाआंबाडा या दाब मंडळ शिवारातील देवदेतांचे पुजन करायचे त्यासाठी काकड झाडाचे पुजा करून निसर्गाचे प्रतिक बनविले होते.

           दाब मंडळाच्या कोठार बाहगोर्या यानी  गांडाठाकोर (विन्यादेव),  आगीपांडर(कणी), अनहोरीदेव (मका) यांचे पालन पोषण केले होते.  पुवीॅच्या काळी समुह शेती करण्याची प्रथा होती.

           त्याप्रमाणे बाहगोर्या यांनी नवीन शेती तयार केली. व त्या शेतात कणी (ज्वारी) ची पेरणी केली. शेत निंदणीसाठी लाहया (सामुहीक मदत) दाब मंडळातील प्रजेला मदतीसाठी बोलावले होते. लाहयाासाठी आलेल्या लोकांना जेवण व दारू दिले. शेतात ज्वारीला कणस येऊन पिकायला लागले. त्याची राखण करण्यासाठी शेताच्या बांधावर माळा बनविला होता. शेत राखण करण्यासाठी बाहगोर्या यानी गांडाठाकोर,आगीपांडर, अलहोरीदेव यांना शेतात पाठविले व माळावर चढून राखण करायचे होते.
           सवाॅत अगोदर गांडाठाकोर यानी चढुन पाहिले. पण त्याला वरती चढताजमलेनाहीत्यानंतर आगीपांडरला चढायला लावले. आगीपांडर वयाने लहान असल्याने पटकन चढुन वरती जा ऊन बसली. त्यानंतर ओलहरीदेव (मका) याला वरती चढायला लावले. परंतु ओलहरीदेव याला वरतीही चढता येत नव्हते व खाली ही उतरता येत नव्हते. त्याला मध्यंतरी बसावे लागले. आगीपांडर (कणी) शेंड्यावर जाऊन बसल्याने वरती लागते.  ओलहरीदेव (मका )मध्येच बसल्याने मध्यभागी लागतो. कणी (ज्वारी ) जेव्हा पिकुन झाल्यावर कापल्यानंतर खळ पुजन राजापांठा याने केले.

          राजापांठा हा अतिशय बलवान व वेगवेगळ्या शस्त्र विद्येत प्रविण होता.  त्याची आई उमरावाणु मंत्रतंत्र विद्येची जननी मानली जाते. तिने राजापांठाला देखील त्याचा संरक्षणासाठी मंत्रतंत्र विद्या शिकवली होती.  तरूणपणी राजापांठा हा त्याचा वडीलांच्या राज्यातील प्रजेला नेहमी मदत करीत असे. 
राजापांठाला नऊ राण्या होत्या त्या 
देवरूपण,  देव काटण,  देवमुरखु,   देवकुपल,   मांडववोरही,   हेलीवोडल,   आगीपांडर,   फुलमोगरा या  पुवीॅच्या आठ राण्या होत्या.

ईकडे हेलोदाब येथे रेलानकेला देवी व पांग्या वणजी यांच्या घरात याहा मोगीच्या जन्म झाला होता.
याहामोगीला  मोगीपेंडरी,  आगीपांडर,  कणी,  अनहोरीदेव,   निसबकसबदेव,  उरतीनपुरतीदेवी,  कुयटी  आथुटी  ही भाऊ बहीण होते.

          याहामोगी वयात आल्यावर राजापांठाने तिला मागणी घातली परंतु राजापांठाला पुवीॅच्या आठ राण्या होत्या.  तो केवळ आपल्या सौंदर्यावर मोहीत होवुन आपल्याशी लग्न करू इच्छितो असे वाटल्याने त्याला घर जवाई म्हणून दाबच्या राजाकडे राहण्याची अट घातली. आपल्या पुवीॅच्या आठ राण्या असुन देखील याहामोगीला प्राप्त करण्यासाठी दाबच्या राजाकडे सात वषेॅ घरजावई म्हणून राहिला. सात वषाॅच्या सेवा काल पुणॅ केल्या नंतर ते दोघे ही घाणीखुट येथे जीवन जगावयाचे ठरविले.

          परंतु त्याना राजा तारहामहल यांनी घरात घेतले नाही. राजापांठा व याहामोगी याना अनेक प्रकारच्या  हाल अपेष्टा सहन करीत जंगलात भटकत राहिले. त्यानंतर त्यानी देवमोगरा गाव वसविले व दोघे  तेथे एक झोपडी वजा घर बांधुन एकटेच राहु लागले. त्या कालावधीत बारा वषाॅच्या दुष्काळ पडला दाब मंडळातील लोकांची गुरेढोरे मरण पावली. बरेच लोक या दुष्काळात मरण पावले व काही लोक आपली घरेदारे सोडून निघून गेले. दाब मंडळातील राज्ये उजाड सारखे झाले.

          या कालावधीत याहामोगीने उपासमारीने हैराण झालेल्या लोकांना भरपुर अन्न धान्य व पशुधन दिले. लोकांना भाकरीसाठी अन्नधान्या व पशुधन पुरविले म्हणून तिला दाब मंडळातील प्रजा याहा मानु लागले.  आदिवासी मध्ये याहा म्हणजे आई व मोगी म्हणजे ज्याची किंमत होत नाही त्याला याहा मोगी सांगतात.

*याहामोगी पुजन* :-
शेतातील धान्य पिकल्यानंतर आपल्या स्वतःच्या शेतातील धान्य एक टोपली मध्ये भरून दर वषीॅ दाब मंडळातील   निमाडपाटी,  आंबुडापाटी,  देहवालपाटी,  मावचार पाटी,  नोयरपाटी,   नाहालपाटी

           या प्रदेशातील प्रजा देवमोगरा गावी आमावस्ये (खुट्टा) च्या दिवशी सामुहीक (होब) एकत्र होउन शेताच्या व अन्नधान्याच्या शोध लावलेल्या आपल्या देवी देवदेतांचे पुजन करतात, तसेच त्यानी तयार केलेल्या कोठार मध्ये धान्य बियाणे स्वरूपात जेव्हा भविष्यात दुष्काळ पडला तर हे साठवुन ठेवलेले बियाणे परत मिळेल या आशेने कोठार मध्ये जमा करत होते. ही परंपरा हजारो वषाॅपूवीॅची असुन ती परंपरा आजही चालत आहेजे आज आपण हिदारी स्वरूपात आणत असलेले टोपलीतील विविध प्रकारचेधान्य पुजन करतांना पाहतो. याहामोगीची पुजा नाही फुलहाराने, नाही नारळ, अगरबत्तीनी याहामोगीची पुजा होते हिदारी व महुफुलाच्या दारूने.

            आदिवासी समाजातील कोणत्याही देवीदेवता यांना फुलहाराने,अगरबत्ती, नारळ किंवा सेंदुर चढवला जात नाही. परंतु आजच्या शिक्षीत आदिवासी समाज आपल्याच वैभवशाली परंपरेला ठेच पोहचवुन प्रकृति विरूद्ध व्यवहार करत आहेत. ज्यामुळे स्वतःच्या परंपरेला नुकसान पोहचवत आहे. खरे हे आहे की,याहामोगीला पुजेसाठी जाण्या अगोदर मानता करून बांबूच्या काड्याची नवी टोपली त्यात विविध प्रकारचेधान्य मुहुफुलाची दारू एका पांढर्या कपड्यात बांधून हिदारी (टोपली )महिलेच्या डोक्यावर ठेवुन देवमोगरा येथे कणी पुजनसाठी जातो. कथा ही आहे की, याहामोगी धन धान्य, फळ फुल,वृक्ष, पान,कंदमुळे, कणी कनसरीचा विविध रूपात धरती पोटी जन्म घेतला आहे.

भगत,पुजारा, बडवे, मोडवी (आदिवासी इतिहास कार) यांच्या मौखिक कथा वरून एक वैभवशाली संस्कृतीच्या इतिहासाची माहिती होते.

            आजही आदिवासी समाजात पुवाॅपार संस्कृति चालत आलेली आहे. त्या संस्कृतिच्या व कणीच्या उगम दाब येथून झाला आहे.  तीच संस्कृति आदिवासी समाजात रूढ झाली ती आजही कायम आहे.

No comments:

Post a Comment

आदिवासी बचाव आंदोलन

¦! दहाड अब मेरे आदिवासी !¦ ऊठ अब मेरे आदिवासी ! कसम तुझे बिरसा ,खाज्या ,तंट्या ,गुलामबाबा और अंबरसिंग महाराज की , द्वेष -मत्सर ,भेदभ...